|| महागणेश पंचरत्न स्तोत्र भाष्य ||
(Image Source : Google)
आदि शंकराचार्य विरचित हे महागणेश पंचरत्न स्तोत्र हे अत्यंत लाभप्रद आणि शीघ्र फल देणारे आहे. याचा प्रभातकाली
नित्यपाठ करणे अत्यंत सिद्धीकारक आहे.
नित्यपाठ करणे अत्यंत सिद्धीकारक आहे.
मुदा करात्त मोदकं सदा विमुक्ति साधकम् ।
कलाधरावतंसकं विलासिलोक रक्षकम् ।
अनायकैक नायकं विनाशितेभ दैत्यकम् ।
नताशुभाशु नाशकं नमामि तं विनायकम् ॥ १ ॥
कलाधरावतंसकं विलासिलोक रक्षकम् ।
अनायकैक नायकं विनाशितेभ दैत्यकम् ।
नताशुभाशु नाशकं नमामि तं विनायकम् ॥ १ ॥
ज्याने आपल्या हातात प्रेमाने मोदक धारण केलेला आहे, जो भक्तजनांना संसार तापातून मुक्त करण्यास तत्पर आहे,
ज्याच्या मस्तकावर चंद्रकोर शोभते आहे, भक्तीच्या विलासात रंगलेल्या लोकांचे जो संरक्षण करतो, अर्थात काम्य
भक्तांचे सुद्धा जो रक्षण करतो, लोकांना त्रासदायक असणाऱ्या सिंदूर दैत्याचा नाश करणाऱ्या आणि सामान्य भक्त
जनांचे अशुभ नाहीसे करणाऱ्या विनायकाला माझा नमस्कार असो.

नतेतराति भीकरं नवोदितार्क भास्वरम् ।
नमत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरम् ।
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरम् ।
महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरम् ॥ २ ॥

गर्वाने अत्यंत उद्धट असणाऱ्या लोकांना जो धाक दाखवतो, ज्याचा वर्ण उदयाला येणाऱ्या सूर्याच्या प्रमाणे
आरक्त आणि तेजस्वी आहे, जो नम्र झालेल्या देवांच्या शत्रूंना जर्जर करतो, जो भक्तांच्या घोर कष्टांचा
उद्धारक आहे, जो आपल्या नम्र भक्तांची सगळी कष्टे हरतो, ज्याला सुरेश्वर, निधिपती, गजराज, गणेश
आणि महेश्वर असेही म्हणतात, त्या श्रेष्ठांच्या पेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या गणपतीचा मी निरंतर आश्रय घेतो आहे.

समस्त लोक शंकरं निरस्त दैत्य कुंजरम् ।
दरेतरोदरं वरं वरेभ वक्त्रमक्षरम् ।
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् ।
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् ॥ ३ ॥

जो सर्व लोकांचे कल्याण करतो, हत्तीसमान विराट राक्षसांचा जो नाश करतो, ज्याचे उदर विशाल आहे,
ज्याचे मुख हत्तीसारखे भव्य आहे, जो सर्वश्रेष्ठ आहे, तत्वतः तो अक्षरब्रह्म, ओंकार स्वरूप आहे, कृपाळू
आहे, क्षमाशील आहे, प्रेमाचा सागर आहे, यश देणारा आहे, नमस्कार करणाऱ्याला उत्तम मन देणारा आहे,
अश्या दैदिप्यमान गजाननाला मी नमस्कार करतो.

अकिंचनार्ति मार्जनं चिरंतनोक्ति भाजनम् ।
पुरारि पूर्व नंदनं सुरारि गर्व चर्वणम् ।
प्रपंच नाश भीषणं धनंजयादि भूषणम् ।
कपोल दानवारणं भजे पुराण वारणम् ॥ ४ ॥

जो अनासक्त आहे, भक्तांच्या दुक्खांचे भंजन करणारा आहे, दारिद्र्य हरण करणारा आहे, वेदाभ्यासातूनच
ज्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होऊ शकते असा आहे, जो शंकराचा सर्वमान्य आणि सर्वत्र अग्रणी असणारा
पुत्र आहे, जो दैत्यांच्या गर्वाचा परिहार करतो, प्रापंचिक कष्टांचा नाश करतो, संसार रुपी आसक्तीपासून
भक्ताला मुक्त करतो, जो अग्नी आणि अन्य देवतांचे भूषण आहे, जो आपल्या गंडस्थलातून पाझरणाऱ्या
दानोदाकाला वारंवार आपल्या सोंडेने पुसतो आहे, जो पुरातन आहे, प्राचीन आहे, अनादी आगे परंतु तरीही
कधीही दर्शन घेतल्यास जो नित्य नूतन भासतो अश्या गणरायाला मी भक्ती भावाने भजत आहे.

नितांत कांत दंत कांति मंत कांत कात्मजम् ।
अचिंत्य रूपमंत हीन मंतराय कृंतनम् ।
हृदंतरे निरंतरं वसंतमेव योगिनाम् ।
तमेकदंतमेव तं विचिंतयामि संततम् ॥ ५ ॥
अचिंत्य रूपमंत हीन मंतराय कृंतनम् ।
हृदंतरे निरंतरं वसंतमेव योगिनाम् ।
तमेकदंतमेव तं विचिंतयामि संततम् ॥ ५ ॥
ज्याची दंतकांति अत्यंत सुंदर आहे , जो महाकालेश्वर शंकराचा पुत्र आहे, ज्याच्या यथार्थ स्वरूपाचे कुणालाही
पूर्णत्वाने ज्ञान होऊ शकत नाही, ज्याच्या अस्तित्वाचा अंत लागत नाही, ज्याचा अंत संभव नाही, भक्तिभावाने
स्मरण केले असता जो विघ्नांचा नाश करतो, जो योगी जनांच्या भक्त जनांच्या हृदयात निरंतर वास करून
आहे अश्या एकदंत विनायकाचे मी निरंतर चिंतन करतो आहे.

महागणेश पंचरत्नमादरेण योऽन्वहम् ।
प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् ।
अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम् ।
समाहितायु रष्टभूति मभ्युपैति सोऽचिरात् ॥

या पाच श्लोकांना महागणेश पंचरत्न असे म्हणतात. ब्रह्ममुहूर्तावर जो कोणी आपल्या अन्तःकरणात महा
गणेशाचे स्मरण करून या स्तोत्राचे पठन करेल त्याला आरोग्य प्राप्त होईल, त्याचे सर्व दोष नाहीसे होतील.
त्याला उत्तम मित्रांचा आणि पुत्रपौत्रादिकांचा सुद्धा लाभ प्राप्त होईल. त्याचे आयुष्य समाधानकारक असेल
आणि त्याला अष्टविध ऐश्वर्य प्राप्त होतील.

इति श्री शंकराचार्य विरचितं श्री महागणेश पञ्चरत्नं संपूर्णम् |
No comments:
Post a Comment